Join us  

देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणार मराठी चित्रपट ‘अजिंक्य’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 4:34 PM

अजिंक्य आणि रितिका च्या भूमिकेत असलेले भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांनादेखील याच संकल्पनेमुळे चित्रपटात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे चित्रीत अजिंक्य या चित्रपटाचे सोशल मीडिया आणि चित्रपट विश्लेषकांकडून कौतुक होताना दिसत आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.अजिंक्य या चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यावर तोडगा काढणारा तरुण याची कथा दर्शविण्यात आल्या कारणाने त्यांनी हा चित्रपट संपूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत असे म्हटले आहे. शेतकरी चळवळीसाठी समर्पित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरू शकेल.

शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याच्या सर्वात मोठ्या बाबींवर भाष्य करणाऱ्या अजिंक्यची आणि सध्या देशात या विषयी सुरू असणाऱ्या घडामोडी याच कारणामुळे सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आयएमडीबी (IMDb) वर सदर चित्रपटाला १० पैकी १० रेटिंग्ज मिळाले आहेत. कालपासून ट्विटरवर देखील मोदी इज अजिंक्य टुडे (#ModiisAjinkyatoday) हा हॅशटॅग ट्रेंड होत असून लोकांमार्फत अजिंक्य या चित्रपटाबद्दल खूप बोललं जात आहे. चित्रपटाचे निर्माते हे जरी  अमराठी असले तरी त्यांना भारतीय शेतकरी आणि त्यांच्या व्यथा ते जवळून जाणतात आणि म्हणूनच दिग्दर्शक अ. कदिर यांच्या उत्कृष्ट संकल्पनेला त्यांनी होकार देत या चित्रपटासाठी आर्थिक सहकार्य उभे करण्याचे धाडस केले. चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणजेच अजिंक्य आणि रितिका च्या भूमिकेत असलेले भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांनादेखील याच संकल्पनेमुळे चित्रपटात काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

याबद्दल निर्माते नीरज आनंद सांगतात, "चित्रपट हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून यातून जनतेचे प्रबोधन व्हावे आणि याच उद्देशाने भारताच्या विविध ठिकाणाहून आलेले आम्ही एकत्र येऊन एका सिनेमासाठी काम करत आहोत. लावलेल्या पैश्याच्या परतफेडीचा विचार न करता एक ज्वलंत विषय लोकांसमोर आणणे आम्हाला महत्वाचे वाटते. हा चित्रपट देशाला जगवणारे अन्नदाते म्हणजेच आपले शेतकरी बंधू यांना समर्पित करण्याची आमची ईच्छा आहे." 

टॅग्स :भुषण प्रधान