Join us  

अजय पुरकरला ऑपरेशन जटायू या नाटकासाठी प्रेक्षकांच्या मिळताहेत अशा प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 3:32 PM

ऑपरेशन जटायू या नाटकाची निर्मिती दिनेश पेडणेकर यांची असून या नाटकात अजय पूरकर यांच्यासोबतच सुनील जाधव, राजू बावडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ठळक मुद्देखूपच सुंदर, एका जागी खिळवून ठेवणारे, पुन्हा पुन्हा पहावसं वाटणारं अप्रतिम नाटक. पहिल्या रांगेत मध्ये बसुन सुद्धा ब्लॅक आऊट मध्ये बदलले जाणारे सेट किंवा सेट वरील 13 कलाकारांची ये-जा यांचा जराही आवाज येत नाही. नेहमीप्रमाणेच यावेळी देखील वेगळा विषय घेतल्याबद्दल दिग्पाल लांजेकर, दिनेश पेडणेकर यांचे कौतुक... अजय पुरकर या भूमिकेत आपली छाप सोडून जातात असे देखील रसिकांनी प्रतिक्रियांद्वारे म्हटले आहे. 

अजय पुरकरने मराठी चित्रपट, नाटकांमध्ये आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फर्जंद या चित्रपटात मोत्याजी मामा ही भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याचसोबत कोडमंत्र या नाटकात देखील तो महत्त्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. नुकतेच त्याचे ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या नाटकातील त्याच्या भूमिकेची प्रेक्षक चांगलीच प्रशंसा करत आहेत. या नाटकातील अजयची भूमिका ही कोडमंत्र या त्याच्या या आधीच्या नाटकातील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. 

ऑपरेशन जटायू हे नाटक एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारे नाटक असून या नाटकाचे लेखन दिग्पाल लांजेकर आणि नितीन वाघ यांनी मिळून केले आहे. या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून पार्श्वसंगीत देवदत्त मनीषा बाजी यांचे आहे. या नाटकातील कलाकारांची वेशभूषा पौर्णिमा ओक यांनी केली आहे. 

ऑपरेशन जटायू या नाटकाची निर्मिती दिनेश पेडणेकर यांची असून या नाटकात अजय पूरकर यांच्यासोबतच सुनील जाधव, राजू बावडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नाटकाची घोषणा झाल्यापासूनच या नाटकाबाबत रसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. हे नाटक सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असून या नाटकातील अजय पूरकर यांची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. रसिक सोशल मीडियाद्वारे आपला अभिप्राय कळवत आहेत. 

खूपच सुंदर, एका जागी खिळवून ठेवणारे, पुन्हा पुन्हा पहावसं वाटणारं अप्रतिम नाटक. पहिल्या रांगेत मध्ये बसुन सुद्धा ब्लॅक आऊट मध्ये बदलले जाणारे सेट किंवा सेट वरील 13 कलाकारांची ये-जा यांचा जराही आवाज येत नाही. इतक्या शिस्तीत केलेलं नाटक पाहताना खरं कोर्ट मार्शल अनुभवतोय की काय असा फील येतो अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. ऐवढेच नव्हे तर नेहमीप्रमाणेच यावेळी देखील वेगळा विषय घेतल्याबद्दल दिग्पाल लांजेकर, दिनेश पेडणेकर यांचे कौतुक... अजय पुरकर या भूमिकेत आपली छाप सोडून जातात असे देखील रसिकांनी प्रतिक्रियांद्वारे म्हटले आहे. 

टॅग्स :अजय पुरकर