Join us  

अग्गंबाई सासूबाई..! प्रार्थना बेहरे इतक्याच दिसायला सुंदर आहेत तिच्या सासूबाई, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 7:00 AM

प्रार्थना बेहरे आणि तिच्या सासूमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. तिची सासू प्रार्थनावर मुलीसारखी माया करते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या सासूसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोतून तिचे आणि सासूमधील खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते आहे. 

प्रार्थना बेहरेच्या सासूचे नाव सरीता जावकर असून मदर्स डेच्या दिवशी तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. प्रार्थनाची सासू मुलीसारखी माया करते.

प्रार्थनाच्या सासूनेदेखील सोशल मीडियावर प्रार्थनासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्यांच्या दोघींमधील खूप चांगले बॉण्डिंग पहायला मिळते.

प्रार्थनाचे लग्न अभिषेक जावकरसोबत झाले आहे. अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.

त्याचबरोबर ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.

कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.

टॅग्स :प्रार्थना बेहरे