Join us  

सैराटनंतर नागराजनं लिहिला ‘पावसाचा निबंध’,लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 6:25 AM

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा सैराटने झिंग झिंग झिंगाटच्या तालावर रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. ...

मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा सैराटने झिंग झिंग झिंगाटच्या तालावर रसिकांना अक्षरक्षा याड लावलं. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले.'सैराट'च्या या यशाचे बहुतांशी श्रेय दिग्दर्शक नागराज मंजुळेला देण्यात आलं. सैराटच्या या यशानंतर नागराज मंजुळेच्या नव्या सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागली आहे.लवकरच तो मराठी रसिकांसाठी नवी कलाकृती घेऊन येत आहे. मात्र नागराजचा हा सिनेमा नसून लघुपट असणार आहे. पावसाचा निबंध असं नागरजच्या या लघुपटाचे नाव आहे.'सैराट'च्या यशानंतर तबबल २ वर्षांनी नागराज हा लघुपट रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या लघुपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला असला तरी यातील कलाकारांची नावं गुलदस्त्यातच आहेत.खुद्द नागराज मंजुळेनेच या लघुपटाची कथा लिहलीय. आता रसिक नागराजच्या या लघुपटाला पसंती देतात का आणि नागराजचा हा पावसाचा निबंध रसिकांना भावतो का हे पाहणं रंजक ठरणार आहे.cnxoldfiles/a>धडक सिनेमाची कथा सैराटप्रमाणेच असेल का, यांत बॉलिवूड मसाला सिनेमाला आवश्यक गोष्टी टाकून हा आणखी बोल्ड करण्यात आला आहे का,सिनेमाची कथा आणि गाणी कशी असतील अशा एक ना अनेक गोष्टींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.सैराटचं संगीत आणि गाणी तुफान हिट ठरली होती.त्यामुळे धडकमध्ये तेच संगीत आणि गाणी असणार का याबाबतही उत्सुकता आहे. याच गोष्टीबाबत 'सैराट' आणि 'धडक' सिनेमाची संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी खुलासा केला आहे.'सैराट' सिनेमातील रसिकांना याड लावणारं ‘याड लागलं’ हे गाणं आणि रसिकांसह मराठी आणि हिंदी सेलिब्रिटींनाही झिंग झिंग झिंगाट ताल धरायला लावणारे गाणं धडक सिनेमातही कायम ठेवण्यात येणार आहे.इतर गाण्यात बदल होतील मात्र ही दोन लोकप्रिय गाणी तशीच ठेवण्यात आल्याची माहिती अजय-अतुल यांनी दिली आहे.