Join us  

गौतमी-स्वानंदनंतर मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 11:46 AM

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लगीनसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar) यांनी लग्न केले आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लगीनसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) आणि स्वानंद तेंडुलकर (Swanand Tendulkar) यांनी लग्न केले आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढला आहे. हा अभिनेता म्हणजे ऋषी मनोहर (Rishi Manohar). ऋषीने डेंटिस्ट असलेल्या पुण्याच्या तन्मई पेंडसे सोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाला मराठी सृष्टीतील काही मोजक्या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती.

ऋषी मनोहर हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील ढेपेवाडा येथे पौर्णिमा मनोहर यांनी व्याही भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. चार दिवसांपूर्वी ऋषी आणि तन्मईच्या लग्नाअगोदरच्या विधींना सुरुवात करण्यात आली होती. ग्रहमख पूजन पार पडल्यानंतर ऋषी आणि त्याचे कुटुंबीय लग्नस्थळी दाखल झाले होते. मेंदी सोहळा, संगीत सोहळा आणि त्यानंतर त्यांच्या हळदीचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 

ऋषी मनोहर याने चित्रपट आणि नाटकात काम केले. आईच्या पावलावर पाऊल टाकत तो मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाला आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकाचे दिग्दर्शन करत असे. अफरा तफरी, एका काळेचे मनी, वंश अशा नाटक, चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर पौर्णिमा मनोहर यांनी लहान असतानाच चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका असलेल्या उंबरठा चित्रपटात पौर्णिमा मनोहर यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटातून पौर्णिमा मनोहर यांनी विविधांगी भूमिका केल्या आहेत.  

टॅग्स :गौतमी देशपांडे