Join us  

लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत 'कुलदीपक'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 7:00 AM

मराठी चित्रपटसृष्टीतल्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण

मराठी चित्रपटसृष्टीत नव्वदच्या दशकात काम केलेले बरेच कलाकार आता चित्रपटसृष्टीतून गायब आहेत. त्यांनी सिनेइंडस्ट्री सोडून इतर क्षेत्रात करिअर करण्याला प्राधान्य दिले आहे. अशीच नव्वदच्या दशकातील एक अभिनेत्री म्हणजे स्मृती तळपदे. डिसेंबर, १९९० साली रिलीज झालेला चित्रपट कुलदीपमध्ये त्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत झळकल्या होत्या.या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला राम राम केला आणि डान्स अकॅडमी सुरू करून इतरांना नृत्याचे धडे देत आहेत.  

 कुलदीपक चित्रपटानंतर स्मृती तळपदे इतर कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाल्या नाहीत. मात्र लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्मृती या दोघांवर चित्रित झालेले इस्पिक, चौकट, किलवर, बदाम… तुझीच राजा होईल गुलाम हे गाणे त्यावेळी चांगले गाजले होते.त्यामुळे तृप्ती तळपदे प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या होत्या. 

कुलदीपक चित्रपटात स्मृती तळपदे यांनी कमलची भूमिका साकारली होती. कमल ही किरणचा( सविता प्रभुणे) भाऊ राजा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रेमात पडते. या दोघांवर इस्पिक चौकट किलवर बदाम हे गाणे चित्रित झाले होते.

स्मृती तळपदे यांच्याबद्दल सांगायचे झाले तर कुलदीपक चित्रपटानंतर त्या अभिनय क्षेत्रात फारशा रमल्या नाहीत.

अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्या आई आणि नृत्य शिक्षिका आशा जोगळेकर यांच्याकडून स्मृती तळपदे यांनी कथ्थकचे धडे गिरवले आणि कालांतराने त्यांनी यातच आपले करिअर करायचे ठरवले.

 

गेल्या कित्येक वर्षांपासून अंधेरी, मुंबई येथे त्यांची नृत्य स्मृती या नावाने डान्स अकॅडमी आहे. या अकॅडमीमधून त्यांनी अनेकांना नृत्याचे धडे दिले आहेत.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे