Join us  

जे बात! अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर पार केला इतक्या लाख फॉलोवर्सचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 4:08 PM

 सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे

 सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. यावेळी मात्र सोनालीने चक्क चाहत्यांचे आभार मानण्यासाठी पोस्ट केली आहे. सोनालीच्या फॉलोवर्सची संख्या इन्स्टाग्रामवर 17 लाख इतकी झाली आहे.

तिने आपले फोटो शेअर करत यासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. चाहते ही यासाठी सोनालीचं अभिनंदन करतायेत. 

अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत तिने पदार्पण केले होते.

तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. लवकरच ती थ्री चिअर्स टू'सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णी