Join us  

अग्गंबाई अरेच्चा चित्रपटातल्या 'या' अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात ओळखणेही कठीण, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 9:00 AM

सोशल मीडियावरच्या माध्यामतून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.'अग्गंबाई अरेच्चा' चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्स चाहते करताना दिसतात.

'अग्गंबाई अरेच्चा' या चित्रपटाने प्रचंड पसंती मिळवली होती. हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. सिनेमात खास आकर्षण ठरली ती अभिनेत्री सोनाली बेंद्रे. चित्रपटात छम छम करता नशीला बदन या आयटम साँगमध्ये ती झळकली होती. या गाण्यानेही प्रचंड पसंती मिळवली होती. याचबरोबर संजय नार्वेकर आणि प्रियंका यादव यांच्या भूमिकांनीही रसिकांची प्रचंड पसंती मिळवली होती. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे चित्रपटाने चांगलीच पंसती मिळवली होती. आजही चित्रपट टीव्हीवर झळकला तर त्याच उत्सुकतेने हा चित्रपट पाहिला जातो. 

महिलांच्या मनात काय सुरुय या गोष्टी संजय नार्वेकरला कळत असतात. मात्र यामुळे त्याची होणारी घालमेल या चित्रपटात मांडण्यात आली होती. श्रीरंग देशमुख नावाची भूमिका संजय नार्वेकरने साकारली होती. एक दिवस देवीकडे 'बायकांच्या मनातले विचार ऐकू येण्याची' इच्छा तो बोलून दाखवतो आणि देवी त्याची ती इच्छा पूर्ण करतेही. दैवी शक्तीने सुरुवातीस श्रीरंग अगदी त्रस्त होतो, पण नंतर या शक्तीमुळे त्याच्या हातून पराक्रमही घडतात. त्याची गोष्ट म्हणजे अगं बाई अरेच्चा हा चित्रपट. चित्रपटात प्रियंका यादवची भूमिकाही लक्षवेधी ठरली होती. चित्रपटात प्रियंकाने आपल्या भूमिकेने कमालीची छाप पाडली होती.

 

ऑनस्क्री साधी सोज्वळ दिसणारी प्रियंका खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. मात्र तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तिला ओळकणंही कठिण जाईल. इतकी ती वेगळी दिसते. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते.

सोशल मीडियावरच्या माध्यामतून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. अग्गंबाई अरेच्चा चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्स चाहते करताना दिसतात. या चित्रपटानंतर आणखी काही चित्रपटातही ती झळकली.

 

वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची प्रचंड पसंती मिळवली. इंडस्ट्रीत तिने तिचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रिंयका चित्रपटापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र सक्रीय असते. 

टॅग्स :संजय नार्वेकरसोनाली बेंद्रे