Join us

"आपण आहोत.. आणि कायम असणारोत...", मृण्मयी देशपांडेने या मराठमोळ्या अभिनेत्यासाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:31 IST

मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होतेय.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.छोटा पडदा गाजवल्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं. मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होतेय.

मृण्मयीने सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सिद्धार्थ चांदेकरच्या बर्थ डे निमित्त मृण्मयीने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. यासोबतचा दोघांचा जुना फोटो देखील शेअर केला आहे. 

आपण असे दिसत असल्या पासून ते आज पर्यंत... आपण आहोत.. आणि कायम असणारोत ... माझ्या लाडक्या मित्रा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... असाच वेडा रहा.. मोठा नको होऊस... आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. अशी पोस्ट मृण्मयीने सिद्धार्थसाठी लिहिली आहे. चाहते तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा करतायेत.  मृण्मयीने शेअर केलेला हा फोटो 2008मध्ये आलेल्या ‘अग्निहोत्र’ या मालिकेतील आहे. यात त्याने ‘नील’ची भूमिका साकारली होती तर मृण्मयीने सईची भूमिका साकारली होती. 

सिद्धार्थ चांदेकर आज आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा करतो आहे. ‘हमने जिना सीख लिया’ या हिंदी सिनेमाद्वारे 2007 मध्ये सिद्धार्थ प्रेक्षकांसमोर आला. 2010मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिलं पाऊल टाकलं. ‘क्लासमेट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,आॅनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार, झिम्मा या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.  

टॅग्स :मृण्मयी देशपांडेसिद्धार्थ चांदेकर