Join us  

एकाच घरात राहून एकमेकांना भेटत नाही प्रथमेश व क्षितिजा , कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:55 PM

मराठी सिनेसृष्टीत कमी वयात नाव कमावलेल्यांपैकी प्रथमेश परब हा एक आहे.

मराठी सिनेसृष्टीत कमी वयात नाव कमावलेल्यांपैकी प्रथमेश परब हा एक आहे.  नुकतेच प्रथमेश परबने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत थाटामाटात लग्न केलं. प्रथमेशच्या लग्नाची खुप चर्चा झाली.  प्रथमेश आणि क्षितीजा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. प्रथमेशच्या लग्नाची खूप चर्चा झाली. प्रथमेशने शेअर केलेल्या व्हिडीओ - फोटोंना चांगलीच पसंती मिळाली होती. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून एकमेंकावरील प्रेम व्यक्त करत असतात. पण, दोघेही एकाच घरात राहात असूनही त्यांची भेट होत नसल्याचे क्षितीजानं सांगितलं. 

नुकतेच प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण झाले. साखरपुड्याला दोन महिने पूर्ण होताच  क्षितिजाने एक खास स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिनं प्रथमेशसोबतचा एक फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये तिनं लिहले, 'डेट अँड डिनर. साखरपुडानंतरचा दुसरा महिना. १४ एप्रिल. एका घरात राहून सुद्धा जेव्हा शूट, नाईट शिफ्ट व ऑफिस यामुळे कित्येक दिवस एकमेकांना भेटता येत नाही आणि तरीही वेळ काढून तुमचे स्पेशल डे तुम्ही आवर्जून साजरे करता'.

प्रथमेश व क्षितिजा कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून ते वेळात वेळ काढत एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत.  प्रथमेश आणि क्षितिजाची लव्हस्टोरीही हटके आहे. इन्टाग्रामवर दोघांची पहिली ओळख झाली. एका फोटोशूटवर प्रथमेशने कमेंट करुन तिला मेसेज केलेला. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. 'टाइमपास ३'च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी वाढत गेली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 

टॅग्स :प्रथमेश परबसेलिब्रिटीसोशल मीडिया