Join us  

शिवसेनाप्रमुखांवरील ठाकरे सिनेमात हा अभिनेता साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका, जाणून घ्या कोण आहे हा कलाकार आणि त्याच्या भूमिकेविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 9:13 AM

सध्या सगळीकडेच 'ठाकरे' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाची रसिकांमध्ये उत्सुकता आहे.सिनेमाचा ...

सध्या सगळीकडेच 'ठाकरे' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाची रसिकांमध्ये उत्सुकता आहे.सिनेमाचा पहिला टीझर लॉन्च झाल्यापासूनच ठाकरे सिनेमाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिजीत पानसेंवर सोपवण्यात आली आहे. ठाकरे सिनेमा म्हटलं की बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची रसिकांना आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला प्रतीक्षा असते. सिनेमाच्या टीझरमधूनच बाळासाहेबांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले होते. हुबेहूब बाळासाहेबांची शैली साकारत नवाजुद्दीनने साऱ्यांची मनं जिंकली आहेत. बाळासाहेबांसोबतच उद्धव, राज, मीनाताई ठाकरे, मनोहर जोशी, शरद पवार यांच्या भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी रसिक आतुर आहेत. मात्र हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु असून सिनेमातील कलाकारांची नावं समोर येऊ लागली आहेत. शिवसेनेच्या स्थापनेच्या काळातील कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेबांसोबतच यांत दत्ता साळवी, मनोहर जोशी, कृष्णा देसाई ही मंडळीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. बाळासाहेबांच्या भूमिकेनंतर या सिनेमात सगळ्यात मोठी भूमिका दत्ता साळवींची आहे. अभिनेता, लेखक प्रवीण तरडे ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांमध्ये छान झुपकेदार मिशी ही त्याची ओळख होती.मात्र दत्ता साळवी या भूमिकेसाठी त्याने आपल्या अतीप्रिय अशा मिशांची आहुती दिली आहे. याआधी प्रवीण तरडेनं फँड्री', 'देऊळ बंद' आणि 'फर्जंद' अशा सिनेमांमधून आपल्या छाप पाडली आहे. आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील सिनेमात एक महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी प्रवीणला लाभली आहे.त्यामुळे त्याच्या या भूमिकेची रसिकांनाही नक्कीच उत्सुकता असेल.cnxoldfiles/a>कारण महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात बाळासाहेबांचे मोठे योगदान आहे.त्यामुळेच बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी त्याने उद्धव यांच्याकडून बारकावे जाणून घेतले.