Join us  

अभिमानास्पद : जेम्स बॉण्डच्या अ‍ॅक्शनला शास्त्रीय संगीताचा ताल, अतुल कुलकर्णीने केला उलगडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2017 9:17 AM

रसिकांच्या ओठावर असणारी आयकॉनिक बॉण्ड थीम म्युझिक भारतीय शास्त्रीय संगीतापासून प्रेरित झाल्याचं आता समोर आलं आहे. हा खुलासा खुद्द बॉण्ड थीम म्युझिकच्या रचनाकाराने केला आहे. याबाबतची एक खास पोस्ट मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

जेम्स बॉण्ड, हॉलीवुडमधील प्रसिद्ध सिनेमा सीरिज.इयान फ्लेमिंग यांच्या कादंबरीवर आधारित बॉण्ड सीरिजमधील प्रत्येक सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला. आजवरील सगळ्यात मोठी सीरिज असलेला हॉलीवुडपट म्हणून बॉण्ड सीरिजकडे पाहिलं जातं.जेम्स बॉण्ड या सिनेमातील प्रत्येक गोष्ट रसिकांना भावली आहे. कलाकारांच्या अभिनयापासून ते कथेपर्यंत प्रत्येक गोष्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. सीरिजमधील प्रत्येक बॉण्डपटात कथा वेगळी होती. मात्र सगळ्या बॉण्डपटात एक गोष्ट बदलली नाही. बॉण्डच्या प्रत्येक सिनेमात एक कॉमन गोष्ट होती ती म्हणजे बॉण्ड थीम''. या बॉण्ड थीमने जगभरातील रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. बॉण्ड थीम असलेली ही म्युझिक प्रत्येक बॉण्ड सीरिज सिनेमाची ओळख बनली. बॉण्ड म्युझिकमध्ये अशी काही जादू होती की आजवरील प्रत्येक सिनेमात हीच थीम म्युझिक ठेवण्यात आली आहे. आता याच बॉण्ड थीम म्युझिकबाबत एक बाब समोर आली आहे. बॉण्ड थीमचं भारतीय कनेक्शन समोर आलं आहे. रसिकांच्या ओठावर असणारी आयकॉनिक बॉण्ड थीम म्युझिक भारतीय शास्त्रीय संगीतापासून प्रेरित झाल्याचं आता समोर आलं आहे. हा खुलासा खुद्द बॉण्ड थीम म्युझिकच्या रचनाकाराने केला आहे. याबाबतची एक खास पोस्ट मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे."जगप्रसिद्ध जेम्स बॉण्ड ट्युनचे भारतीय शास्त्रीय संगीताशी संबंध आहे. बॉण्ड थीम रचणा-या संगीतकाराने याबाबतची गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट खरंच अदभुत आहे. हा व्हिडीओ मला माझ्या तमिळ सिनेमातील सहकलाकार अजिथ यांनी पाठवला आहे. धन्यवाद अजिथ सर" अशी पोस्ट अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टसह अतुल कुलकर्णी यांनी बीबीसी 1मधील शोचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो त्यांना त्यांच्या तमिळ मित्राने फॉरवर्ड केला आहे. यांत बॉण्ड थीमचा संगीतकार मॉण्टी नॉर्मन यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या व्हिडीओत नॉर्मन हे बॉण्ड सिनेमाच्या सुरुवातीपासूनचा प्रवास सांगत आहेत. यांत बॉण्ड थीमचा जन्म कसा झाला हे गुपितही त्यांनी उलगडलं आहे. बॉण्ड थीम म्युझिक रचताना भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर कसा करण्यात आला याची छानशी कथा नॉर्मन यांनी शेअर केली आहे. ही थीम म्युझिक बनवताना  सतारचा वापर कसा करण्यात आला हेही नॉर्मन या व्हि़डीओत सांगत आहेत. ही मुलाखत ऐकून तमाम भारतीयांची मान अभिमानानं उंचावल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या बॉण्ड थीम म्युझिकने जगातील संगीत रसिकांवर गारुड घातलं ती थीम म्युझिक भारतीय शास्त्रीय संगीतापासून प्रेरित असल्याचे मॉण्टी नॉर्मन यांनी सांगितले आहे. ही सुखद बातमी पहिल्यांदाच समोर आली आहे. आधी तमिळ अभिनेता अजिथ आणि मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्यामुळे ही गुडन्यूज सा-यांना कळली आहे.