Join us  

‘आसूड’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 7:23 PM

शेतकरी कुटुंबीयांची होणारी होरपळ आणि व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक याविरूद्ध एका युवकाचा लढा दाखवणाऱ्या ‘आसूड’ या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला.

ठळक मुद्देअमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही जोडी या चित्रपटात झळकणार आहेयेत्या ८ फेब्रुवारी ला ‘आसूड’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

शेतकरी कुटुंबीयांची होणारी होरपळ आणि व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक याविरूद्ध एका युवकाचा लढा दाखवणाऱ्या ‘आसूड’ या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे गृहराज्यमंत्री मा.डॉ.रणजीत पाटील यांनी चित्रपटाचे संगीत अनावरण केले. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. येत्या ८ फेब्रुवारी ला ‘आसूड’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वास्तववादी विषय मांडल्याबद्दल निर्माता दिग्दर्शकाचे कौतुक करताना मा.डॉ.रणजीतपाटील यांनी चित्रपटाला मन:पूर्वक...शुभेच्छा दिल्या. ‘आसूड’ च्या निमित्ताने मराठी चित्रपटाला संगीत देणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती’ असं सांगत अनु मलिक यांनी मराठीतल्या पदार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला. सर्वसामान्यांच्या जीवनाला भिडणारे प्रश्न मांडत वास्तवाची जाणीव करून देणे आज गरजेचे असून ‘आसूड’ च्या माध्यमातून हा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी केले.

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही जोडी या चित्रपटात झळकणार आहे. कथेच्या अनुषंगाने येणाऱ्या तीन गीतांना सोनू निगम, आदर्श शिंदे, दिव्या कुमार आणि अनमोल मलिक यांनी स्वरबद्ध केले आहे.

शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न तथा क्लिष्ट सरकारी यंत्रणा व राजकीय पाठबळ असलेले उद्योग जनसामान्यांचा कसा उपयोग करून घेतात याचे चित्रण ‘आसूड’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.

गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. ८ फेब्रुवारीला ‘आसूड’ प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :विक्रम गोखलेसोनू निगमअमित्रियान पाटील