Join us  

'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर 'आई कुठे...' फेम अरुंधती भारावली, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:04 PM

"चित्रपट पाहिल्यानंतर...", 'बाईपण भारी देवा'साठी मधुराणी गोखलेची खास पोस्ट

मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटातील गाण्याचे व सिनेमागृहातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनेही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटासाठी मधुराणीने खास हा व्हिडिओ केला आहे. "बाईपण भारी देवा या चित्रपटाचं कौतुक करण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे," असं तिने व्हिडिओत म्हटलं आहे. 

"घरभाडं द्यायलाही माझ्याकडे पैसे नव्हते, पण...", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' कटू प्रसंग

"ट्रेलर बघितल्यानंतरच हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायचं, हे मी ठरवलं होतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला जे वाटलं, तेच महाराष्ट्रातील आणि जगभरातील इतर मराठी महिलांनाही वाटलं असणार. त्यामुळेच चित्रपटाला एवढा प्रतिसाद मिळत आहे. केदार सर एवढा चांगला चित्रपट आणि उत्तम स्त्री व्यक्तिरेखा दिल्याबद्दल थँक्यू. शिल्पा, सुचित्रा, रोहिणीताई, वंदना मावशी, दीपा तुम्ही चाबूक कामं केली आहेत. खूप सारं प्रेम," असंही पुढे मधुराणीने व्हिडीओत म्हटलं आहे. 

"वहिनींना नमस्कार", सोहम बांदेकरचा 'त्या' मुलीबरोबरचा फोटो व्हायरल, अभिनेता म्हणाला...

मधुराणीने पुढे या व्हिडिओत प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहनही केलं आहे. "जिओ सिनेमा मराठी आणि निखिल साने यांच्या टीमचं विशेष कौतुक. ज्या पद्धतीने तुम्ही चित्रपटाचं प्रमोशन केलं त्याने हे सिद्ध झालं की चांगला चित्रपट असेल आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचला तर आजही मराठी माणूस थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला तयार आहे. अशा चांगल्या चित्रपटाची मराठी सिनेसृष्टीला गेली काही वर्ष गरज होती," असंही मुधराणी म्हणाली आहे.  

टॅग्स :मराठी चित्रपटमराठी अभिनेतामराठी गाणी