Join us  

शिवानी-विराजस आहेत व्यावसायिक; तुम्हाला माहितीये का त्यांच्या ब्रँडविषयी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 5:59 PM

Shivani rangole and virajas kulkarni:खास नाटकप्रेमी रसिकांसाठी शिवानी-विराजसने हा ब्रँड सुरु केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी. या दोन्ही कलाकारांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांच्या फिल्मी करिअरची कायमच चर्चा रंगते. मात्र, यावेळी त्यांच्या पर्सनल आयुष्याची चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे.

विराजस आणि शिवानी केवळ कलाकार नसून व्यावसायिकदेखील आहेत. या दोघांच्या कपड्यांचा ब्रँड आहे. विरानी असं त्यांच्या ब्रँडचं नाव असून या ब्रँडअंतर्गत थिएटर थीमचे टी शर्ट तयार केले जातात. रफुचक्कर या ब्रँडशी संगनमताने त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे.

'शांतता नाटक चालू आहे', 'कॉर्नरची २', 'बॅकस्टेज आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' असे भन्नाट मेसेज त्यांनी त्यांच्या ब्रँड टी शर्टमधून दिले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मृणाल कुलकर्णी यांनी या संदर्भात एक पोस्टही शेअर केली होती. या पोस्टमधून त्यांनी त्यांच्या मुलांच्या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'विरानी'च्या या नव्या ब्रँडला तुमच्याही आशीर्वादाची गरज आहे असे म्हणत शिवानीने आपल्या चाहत्यांना या नव्या व्यवसायाची ओळख करून दिली. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत विराजसने सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शन म्हणून भूमिका पार पाडली होती. 

टॅग्स :विराजस कुलकर्णीशिवानी रांगोळेसेलिब्रिटीटेलिव्हिजन