Join us  

'लय फास्ट संपतं आयुष्य..'; 'या' खास व्यक्तीसाठी उर्मिला निंबाळकरची हटके पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 7:40 PM

Urmila nimbalkar: यावेळी उर्मिलाने लेकासाठी किंवा नवऱ्यासाठी नव्हे तर आणखी एका खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे उर्मिला निंबाळकर (urmila nimbalkar). सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेली उर्मिला सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन व्हिडीओ शेअर करत असते. यात अनेकदा ती तिच्या जीवनातील काही अपडेट्सही चाहत्यांना देते. सध्या उर्मिला तिचा लाडका लेक अथांगचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. वा, त्याच्यासाठी काही पोस्टही लिहित असते. मात्र,यावेळी उर्मिलाने लेकासाठी किंवा नवऱ्यासाठी नव्हे तर आणखी एका खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे.

उर्मिलाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट तिच्या भावजयेसाठी आहे. अनेक जण या दोघींना बहिणी मानतात त्यामुळेच नात्याची खरी व्याख्या काय हे तिने या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

"आत्तापर्यंत किमान १०० जणांनी आम्हाला बहिणी म्हटलं असेल. विनाकारण समाजनिर्मित व्याख्येप्रमाणे नाती जगायला लागलं की उगीचच तिढे तयार होतात. हि नणंद, ती भावजय असल्या फंदात न पडता, वेळेत मैत्री करुन लवकरात लवकर त्या व्यक्तीला आपलंसं केलं की,पटापट ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा भाग होते आणि खुप genuine प्रेमावर नातं पुढे सरकत राहतं", असं उर्मिला म्हणाली.

पुढे ती म्हणते, "प्रचंड हुशार, नम्र, प्रेमळ आणि खतरनाक आवाज असलेली @anujavaibhav माझी खुपच जवळची मैत्रीण आहे. आज हा अचानक सापडलेला जुना फोटो पाहून आम्ही किती सतत आनंदात, सहज, मैत्रीत वावरत असतो हे लक्षात आलं. लय फास्ट संपतं आयुष्य, भांडत बसायलाही वेळ नाही दवडायला पाहिजे. इतकं cool असल्याबद्दल thank you.

दरम्यान, अनुजा ही उर्मिलाच्या भावाची पत्नी आहे. अनेकदा या दोघी एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात. तसंच त्या अनेकदा एकत्र पिकनिक प्लॅनही करतात. त्यामुळे बऱ्याचदा उर्मिलाच्या पोस्टमध्ये अनुजाचा उल्लेख असतो.

टॅग्स :उर्मिला निंबाळकरटेलिव्हिजनसेलिब्रिटी