Join us  

"तुझी आईच माझी सासू बनणार...", घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 5:05 PM

मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला मानसीने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. बघतोय रिक्षावाला या गाण्याने मानसीला प्रसिद्धीझोतात आणलं. या गाण्यामुळे रातोरात स्टार झालेली मानसी नंतर अनेक गाण्यांमध्ये दिसली. मानसी ही लोकप्रिय अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम डान्सरही आहे. बाई वाड्यावर या पासून ते गुलाबी नोट ही मानसी नाईकची गाणी सुपरहिट ठरलेली आहेत. इंडस्ट्रीतील करिअरबरोबरच मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. 

मानसी नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत असते. अनेकदा ती तिचे व्हिडिओही शेअर करत असते. आतादेखील मानसीच्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच मानसी नाईकचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता ती पुन्हा प्रेमात पडली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मानसीने चॉकलेटी रंगाची साडी नेसल्याचं दिसत आहे. हलकासा मेकअप करत तिने मोत्याचे ज्वेलरी घातली आहे. स्पर्श झाले या गाण्यावर मानसीने रील बनवला आहे. या व्हिडिओला मानसीने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

या व्हिडिओला तिने "काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार…", असं कॅप्शन दिलं आहे. तिचं हे कॅप्शन वाचून मानसी पुन्हा बोहल्यावर चढणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्य या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

टॅग्स :मानसी नाईकसेलिब्रिटी