Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या, मस्त रहा म्हणत सुबोध भावेने डिलीट केले ट्विटर अकाऊंट

By रूपाली मुधोळकर | Updated: September 23, 2020 18:36 IST

सुबोधने अचानक अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय का घेतला?

ठळक मुद्देसुबोध भावे आपल्या ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेची निर्मिती करत आहे

मध्यंतरीच्या काळात वाढत्या ट्रोलिंगला कंटाळून बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी ट्विटरला रामराम ठोकला होता. आता मराठीचा दिग्गज अभिनेता सुबोध भावे यानेही ट्विटरला अलविदा करत स्वत:चे अकाऊंट डिलीट केले आहे. स्वत: सुबोधने खुद्द ही माहिती दिली.‘आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाऊंट डिलीट करतो आहे. काळजी घ्या, मस्त रहा़. जय महाराष्ट्र, जयहिंद’, अशी पोस्ट सुबोधने केली आहे.

म्हणे कंटाळा आला...ट्विटर अकाऊंट का डिलीट केले? यामागच्या कारणांचा खुलासा सुबोधने केला आहे. ‘मी ट्विटरवरून बाहेर पडण्याचे काहीही विशेष कारण नाही पण कंटाळा आला आहे. इतर कुठेही वेळ घालवता येईल. त्यामुळे मी ट्विटर सोडत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत इतक्यात नाही सांगू शकत. पण फेसबुकबाबत देखील असा निर्णय घेऊ शकतो, अशी प्रतिक्रिया त्याने एबीपी माझाशी बोलताना दिली.

घेऊन येतोय, शुभमंगल ऑनलाईन

सुबोध भावे आपल्या ‘कान्हाज मॅजिक’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेची निर्मिती करत आहे. अलीकडे त्याने या मालिकेची घोषणा केली होती.  आतापर्यंत आपण सूडाच्या अनेक मालिका पाहिल्या आहेत. आता  शुभमंगल ऑनलाइन च्या माध्यमातून एक हलकीफुलकी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशा शब्दांत अभिनेता सुबोध भावेने या मालिकेचे वर्णन केले होते. सुबोधची ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सायली संजीव आणि सुयश टिळक अशी नवीन जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :सुबोध भावे