Join us  

Santosh Juvekar : “हे काय आहे ओ? बहुतेक गुदमरून मारण्यासाठी...”, संतोष जुवेकर यांची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:25 PM

Santosh Juvekar : संतोष जुवेकरनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर (Santosh Juvekar). झेंडा, मोरया, रेगे यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. दमदार अभिनयामुळे चर्चेत असणार संतोष सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याची सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टसोबत संतोषने एक व्हिडीओ शेअर केला आहे.'हे काय आहे ओ? बहुतेक गुदमरून मारण्यासाठी केलेले contract किंवा स्वतः गुदमरून मरण्यासाठी केलेली सोय?', असं कॅप्शन देत संतोषने केलेली ही पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.  अनेक नेटकऱ्यांनी संतोषच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

 सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. आपण फक्त बघा आणि शांत बसा, असंच होणार.., असं एका युजरने म्हटलं आहे. आकाशी उंच उडणारे पक्षी पण पा त्या धुरातून गुदमरून ओरडत इकडून तिकडून उडताना दिसत आहेत  किती भयानक आहे हे सर्व, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

संतोष जुवेकरने मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. या गोजिरवाण्या घरात, वादळवाट, ऊन-पाऊस, किमयागार या त्याच्या मालिका एकेकाळी तुफान गाजलेल्या आहेत. झेंडा, मोरया, रेगे यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून संतोषने रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे. एक थी बेगम या वेब सीरिजमध्ये देखील संतोषनं साकारलेली भूमिका विशेष गाजली.   संतोषचा काही महिन्यांपूर्वी ‘36 गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.  

टॅग्स :संतोष जुवेकरमराठी अभिनेता