Join us  

हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन, शेअर केली भावूक पोस्ट, म्हणाला, " तू आज आमच्यात नाहीयेस पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 1:34 PM

वहिनीच्या निधनानंतर हार्दिकने भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचला. हार्दिक जोशीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वहिनीचं निधन झालं आहे. हार्दिकने पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. वहिनीच्या निधनानंतर हार्दिकने भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

वहिनीच्या निधनानंतर हार्दिकची भावूक पोस्ट

ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझ अस्तित्व आमच्यात कायम राहील...जाऊबाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे... तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय. कारण, तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतंस की हार्दिक काही झालं तरी हा शो तू करणारच आहेस. योगायोग असा आहे की ४ डिसेंम्बरच्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे. मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो. तेव्हा कायम डोक्यावर हात फिरऊन तू मला आशीर्वाद द्यायची...🙏🏻तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे🙏🏻आज मि जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे. तू सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल Miss you @jyoti.naisha i माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको 🙏🏻 Always love you always khup khup miss you

हार्दिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 'जाऊ बाई गावात' या शोमधून हार्दिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'क्लब ५' हा त्याचा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'तुझ्यात जीव रंगला'नंतर हार्दिक अनेक मालिकांमध्ये दिसला होता. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतही तो झळकला होता. 

टॅग्स :हार्दिक जोशीमराठी अभिनेताटिव्ही कलाकार