Join us  

"....म्हणून मी आईचं नाव लावतो", भूषण प्रधानचा खुलासा, म्हणाला, "लोकांना वाटतं माझ्या आईवडिलांचा घटस्फोट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 5:46 PM

भूषण प्रधानने सांगितलं आईचं नाव लावण्यामागचं खरं कारण, म्हणाला...

मराठीबरोबर हिदी चित्रपटसृष्टी गाजवलेला अभिनेता भूषण प्रधान अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. भूषण त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतो. अभिनयाबरोबरच तो फिटनेससाठीही ओळखला जातो. अनेक अभिनेत्यांप्रमाणे भूषणही वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लावतो. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत भूषणने यामागचं कारण स्पष्ट केलं. 

भूषणने नुकतीच अभिनेत्री सुलेखा तळवलकरच्या 'दिल के करीब' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्य आणि अभिनय क्षेत्रातील करिअर याबाबतही भाष्य केलं. भूषणला या मुलाखतीत आईचं नाव लावण्यामागचं कारण विचारण्यात आलं. यावर त्याने अगदी सविस्तरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, "बऱ्याच जणांना असं वाटतं की आईवडिलांचा घटस्फोट झालाय किंवा काहीतरी वाद आहे, म्हणून मी आईचं नाव लावतो. पण, असं काहीच नाहीये. मी माझ्या वडिलांवरही तेवढंच प्रेम करतो. मला घडविण्यात दोघांचा वेगळा वाटा आहे. त्यात आईचा वाटा जास्त आहे." 

एकेकाळी पुण्याच्या रस्त्यावर पॅम्प्लेट विकायचा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "एमबीए झाल्यानंतर..."

"आपल्याकडे पहिल्यापासूनच सगळीकडे वडिलांचं नाव लावलं जातं. सर्टिफिकेटवरही आईच्या नावासाठी वेगळी जागा असते. संपूर्ण नावात आईचं नाव कधीच येत नाही. माझं एमबीए झाल्यानंतरही अभिनयात करिअर करण्यासाठी मला वडिलांनी तुझे पैसे तुला कमवावे लागतील असं सांगितलं होतं. पण, या सगळ्यात मला आईने खूप मदत केली. मी कसे पैसे कमवू शकतो, यासाठी तिने मला मदत केली. या सगळ्यासाठी तिने मला खूप पाठिंबा दिला. अभिनेता झाल्यानंतर मग मी आईचं नाव लावायला सुरुवात केली. आपल्याकडे वडिलांचं आडनाव आपण सगळेच लावतो. पण, ज्या आईने कष्ट घेतले तिचं नाव कोणालाच कळत नाही. माझ्या या यशात तिचा वाटा सर्वात जास्त आहे. आणि हे माझ्या वडिलांना सुद्धा मान्य आहे. आम्हाला घडवण्यात तिचा खूप मोठा वाटा आहे, हे माझं वडिलंही म्हणतात. त्यामुळे माझं नाव तू का लावत नाहीस, असा प्रश्न माझ्या वडिलांनीही कधी विचारला नाही," असंही पुढे भूषण म्हणाला.

"मी एअरपोर्टवरही मराठीतच बोलतो", 'सुभेदार' फेम अजय पूरकर यांचं वक्तव्य, म्हणाले, "एखादी फ्रेंच बाई..."

भूषणच्या आईचं नाव सीमा तर वडिलांचं नाव चंद्रकांत असं आहे. भूषण सीमा प्रधान असं अभिनेता त्याचं पूर्ण नाव लिहिचो. भूषणने 'कॉफी आणि बरंच काही', 'निवडुंग', 'मिसमॅच' यांसारख्या चित्रपटांतून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. त्याने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :भुषण प्रधानमराठी अभिनेतामराठी चित्रपट