श्र द्धा कपूर नुकतीच ३४ मजली बिल्डिंगवर रॅपलिंग करताना आढळली. अहो, हे खरे आहे़़़ वरळीतील एका फोर सीजन हॉटेलच्या एक्स्टेरिअरला ती लटकली होती. एका अॅडशूटसाठी ती ही ट्रेनिंग घेत होती. जाहिरातीच्या स्टोरीत कलाकार एका बिल्डिंगच्या एक्सटेरियरला रॅपल करताना शूट करणे अपेक्षित होते. श्रद्धाने नुकतेच तिच्या आगामी चित्रपट ‘बाघी’ साठी अॅडव्हेंचर्स केले आहेत. तिने काही स्टंट्स ‘बाघी’ मध्येही केले असून जेव्हा तिला अॅडसाठी शूट करायचेय हे कळाले तेव्हा ती रॅपलिंग करण्यासाठी खूपच उत्सुक होती. श्रद्धा ‘बाघी’मध्ये टायगर श्रॉफसोबत तर ‘रॉक आॅन २’मध्ये फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.
श्रद्धाचा अॅडव्हेंचर मूड!
By admin | Updated: January 13, 2016 02:32 IST