Join us

मानसीला करावी लागणार प्रतीक्षा

By admin | Updated: February 24, 2015 23:54 IST

२०१३ सालची मिस इंडिया मानसी मोघेचा पहिलावहिला मराठी चित्रपट 'बुगडी माझी सांडली गं’ २० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता.

२०१३ सालची मिस इंडिया मानसी मोघेचा पहिलावहिला मराठी चित्रपट 'बुगडी माझी सांडली गं’ २० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता त्याला आणि पर्यायाने मानसीला त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाला काही चित्रपट महोत्सवांचे आमंत्रण आल्याने त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे. त्यातच मुलांच्या परीक्षा संपल्यानंतरच तो प्रदर्शित होणार असल्याने त्याला अधिक चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसीला प्रतीक्षा करावी लागणार आहे.