नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी पांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात प्रलंबित अंगप्रदर्शनाबाबतची खासगी तक्रार रद्द करून ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत ऊर्फ रीमा लांबाला दिलासा दिला.शेतकरी रजनीकांत बोरेले यांनी मल्लिकाच्या अंगप्रदर्शनाविरुद्ध तक्रार केली होती. न्यायालयाने मल्लिकाला समन्स बजावले होते. तिने उच्च न्यायालयात धाव घेऊन कार्यवाही रद्द करण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी मल्लिकाची विनंती मंजूर केली.
मल्लिका शेरावतला दिलासा
By admin | Updated: October 30, 2015 00:51 IST