Join us  

बी-टाऊनमध्ये नव्या कपलची चर्चा, मलायकाचा मुलगा-रवीनाच्या मुलीवर खिळल्या नजरा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 11:53 AM

अरहान आणि राशा याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळतं. अशाच या सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत, ते म्हणजे मलायका – अरबाज यांचा मुलगा अरहान खान अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी. अरहान आणि राशाची मैत्री आणि त्यापलीकडलं त्यांचं नातं बऱ्या महिन्यांपासून आकर्षणाचा विषय ठरत आहे. दोघांच्या अफेअरच्या चर्चा बीटाऊनमध्ये सुरु झाली आहे.

नुकतेच हे दोघे एकत्र दिसले होते. अरहान आणि राशा याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. यावेळी राशाने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. तर दुसरीकडे अरहान खानने पांढरा टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. यामध्ये तो स्टायलिश दिसत होता. याआधीही दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. नुकतेच राशाने रवीना टंडनसहअरबाज खान-शुरा यांच्या लग्नालाही हजेरी लावली होती  बी-टाऊनला राशा आणि अरहानच्या रूपात एक नवीन जोडपे मिळालं आहे. राशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. 

टॅग्स :अरबाज खानसेलिब्रिटीबॉलिवूडरवीना टंडन