Join us  

Majha Agadbam मध्ये झळकणार सैराट फेम 'तानाजी'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:06 AM

तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात तो 'वजने' नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. दहा वर्षापूर्वी तुफान प्रसिद्धी मिळवणाऱ्या 'अगडबम' सिनेमाचा दमदार सिक्वेल असलेल्या 'माझा अगडबम' सिनेमात तो नाजुकाच्या मित्राची भूमिका करताना दिसून येणार आहे.

'सैराट' या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील परशा आणि आर्ची या व्यक्तिरेखा तर प्रचंड गाजल्या होत्या. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांना या पहिल्याच चित्रपटाने स्टार बनवले. त्यांच्यासोबतच या चित्रपटातील इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या. यांत आवर्जुन उल्लेख करावा लागेल तानाजी गालगुंडे याचा. लवकरच तानाजी एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आगामी 'माझा अगडबम' या सिनेमाद्वारे तो पुन्हा एकदा झळकणार आहे. 

तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात तो 'वजने' नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. दहा वर्षापूर्वी तुफान प्रसिद्धी मिळवणाऱ्या 'अगडबम' सिनेमाचा दमदार सिक्वेल असलेल्या 'माझा अगडबम' सिनेमात तो नाजुकाच्या मित्राची भूमिका करताना दिसून येणार आहे. 'पेन इंडिया कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत या सिनेमाचे लिखाण आणि दिग्दर्शन तृप्ती भोईरचेच आहे. शिवाय टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. तसेच रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात तानाजी 'नाजूका' बरोबर काय धम्माल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.    

'माझा अगडबम' या सिनेमाचा हा पोस्टर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आले.

'माझा अगडबम'च्या या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो. पण या दोघांबरोबरच आणखीन एक अगडबम व्यक्ती यात आपल्याला दिसून येत आहे. अशा या दोन अगडबम व्यक्तींच्यामध्ये अडकलेला सुबोध भावे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे.  

 

टॅग्स :माझा अगडबम