Join us  

"बोलत बोलत ते माझ्यासोबत.." महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने सांगितला फॅनचा तो विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:04 PM

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीकने त्याला आलेला विचित्र अनुभव सांगितला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) मधले सर्व कलाकार आज स्टार झाले आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहेत. चाहत्यांनी सर्वांना अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. मात्र या कलाकारांना इथपर्यंत पोहचण्यासाठी मोठा स्ट्रगल करावा लागला हेही तितकंच खरं आहे.  हास्यजत्रेतील असाच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap). पृथ्वीकने आपल्या जबरदस्त विनोदाच्या टायमिंगने सर्वांचे मन जिंकले. 

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीकने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. यावेळी पृथ्वीला  फॅनचा आलेला एखादा विचित्र अनुभव असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना पृथ्वीक म्हणाला, मला एका काका भेटले होते, जेव्हा मी एक मालिका करत होतो श्रुती मराठे सुप्रिया ताई आणि अतुल परचुरे यांच्यासोबत मी एक मालिका करत होतो. त्यावेळी ठाण्यावरुन मी बदलापूरला ट्रेनने प्रवास करत होता. कारण त्यावेळी मी बदलापूरला राहत होतो. त्यादरम्यान ट्रेनमध्ये मला एक काका भेटले ज्यांना डोंबिवलीला उतरायचे होते. पण बोलत बोलत ते माझ्यासोबत बदलापूरपर्यंत आले आणि त्यांना मला त्यांच्या पुतणीचं स्थळ आणलं. हा माझ्या आयुष्यातील हा अत्यंत विचित्र आलेला फॅनचा अनुभव होता हा.     

दरम्यान पृथ्वीकने आंतरमहाविद्यालयीन एकांकिकापासून अभिनयाला सुरुवात केली. पुढे यूथ फेस्टिव्हल, पथनाट्य, एकांकिका स्पर्धा, व्यावसायिक नाटक, हास्यजत्रा अशा विविध ठिकाणी त्यानं अभिनय कौशल्याची कमाल दाखवली. काही काळ त्यानं नोकरीही केली. परंतु त्यात तो रमला नाही. त्यानंतर ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेतील ‘राहुल’ या विनोदी व्यक्तिरेखेमुळे पृथ्वीक महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला. 

टॅग्स :पृथ्वीक प्रतापमहाराष्ट्राची हास्य जत्रा