लंडनमध्ये एका सोहळ्यात पॉप गायिका मॅडोनाची फजिती उडाली. कार्यक्र म सुरू होताच मॅडोना अडखळून पडली. त्या वेळी उपस्थित चाहत्यांच्या काळजाचा ठोका क्षणभर का होईना चुकला. मात्र काही क्षणांत तिने स्वत:ला सावरले आणि पुन्हा माहोल बेहोश करणारा परफॉर्मन्स दिला. या वेळी शाही वस्त्रासारखे मखमली कपडे तिने खांद्यावरून टाकलेले होते. ओढणीसारख्या या कपड्यांनी दगा दिल्याचे स्पष्टीकरण तिने सोशल साइट्सवर केले.
मेडोना स्टेजवरून पडली
By admin | Updated: February 27, 2015 23:14 IST