Join us  

माधुरी दीक्षितने मुंबईत भाड्याने घेतलं घर, दर महिन्याचं भाडं वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 11:34 AM

Madhuri Dixit House Rent : माधुरी दीक्षितही शानदार लोकेशनमध्ये एक अपार्टमेंटसाठी लाखो रूपये खर्च करते. एका रिपोर्टनुसार माधुरी दीक्षित सध्या वेगवेगळ्या शोसाठी काम करण्यासाठी मुंबईतच राहत आहे. 

बॉलिवूड स्टार्सच्या (Bollywood Stars) लक्झरी लाइफबाबत जाणून घेणं सर्वांनाच आवडतं. पण या लक्झरी लाइफसाठी ते मोठी किंमतही चुकवतात. माधुरी दीक्षितही (Madhuri Dixit) शानदार लोकेशनमध्ये एक अपार्टमेंटसाठी लाखो रूपये खर्च करते. एका रिपोर्टनुसार माधुरी दीक्षित सध्या वेगवेगळ्या शोसाठी काम करण्यासाठी मुंबईतच राहत आहे. 

Zapkey.com जवळ माधुरीच्या या अपार्टमेंटच्या भाड्याचे कागदपत्रे आणि माहिती दिली आहे. या कागदपत्रानुसार माधुरी दीक्षितने ३ वर्षासाठी हे अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे. हे अपार्टमेंट वरळी येथील इंडियाबुल्स ब्लूमध्ये लोकेटेड आहे. २९व्या फ्लोरवर असलेल्या माधुरीचं हे अपार्टमेंट ५५०० स्क्वेअर फूट परिसरात पसरलं आहे. 

या अपार्टमेंटसाठी माधुरीने३ कोटी रूपये डिपॉझिट केले आहेत. या प्रॉपर्टीनुसार तिच्याकडे पाच कवर्ड कार पार्स्क आहेत. घराचं रेंट एग्रीमेंट २६ ऑक्टोबर २०२१ ला रजिस्टर केलं आहे. लोकल ब्रोकर्सनी सांगितलं की, या शानदार बिल्डींगमध्ये ३०० अपार्टमेंट्स आहेत. यात २ बीएचके, ३बीएचके आणि ४ बीएचके घरे आहेत. यांची किंमत ४.५ कोटी रूपयांपासून ते १५ कोटी रूपयांपर्यंत आहेत.   

टॅग्स :माधुरी दिक्षितबॉलिवूडसेलिब्रिटी