Join us  

'लव्‍ह के लिए कुछ भी करेगा', मालिका 'भाखरवडी'मध्‍ये अभिषेक आणि महेंद्राचा नवीन अवतार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 5:15 PM

पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित 'भाखरवडी' ही एक विनोदी मालिका आहे. ही मालिका भाखरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करत असलेल्‍या मराठी व गुजराती कुटुंबांमधील विचारसरणीमधील फरकाला सादर करते.

गोखले व ठक्‍कर कुटुंबांमध्‍ये एकी आणण्‍याच्‍या प्रयत्‍नांबरोबरच नवविवाहित जोडपे अभिषेक (अक्षय केळकर) आणि गायत्री (अक्षिता मुदगल) यांना एकत्र आणण्‍याच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये मालिका 'भाखरवडी'मध्‍ये अनेक ट्विस्‍ट्स आणि वळणे पाहायला मिळाली आहेत. जीवनाचा सार दाखवणारी ही मालिका तिच्‍या हलक्‍या-फुलक्‍या पटकथेसह प्रेक्षकांना आकर्षून घेत आहे. पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित 'भाखरवडी' ही एक विनोदी मालिका आहे. ही मालिका भाखरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करत असलेल्‍या मराठी व गुजराती कुटुंबांमधील विचारसरणीमधील फरकाला सादर करते. प्रेमीयुगुल गायत्री व अभिषेक त्‍यांच्‍या विवाहानंतर एकत्र येण्‍याचा प्रयत्‍न करत असताना मालिका आगामी एपिसोड्समध्‍ये सर्वात अनपेक्षित वळण घेणार आहे. 

मालिका 'भाखरवडी'मध्‍ये गोखले व ठक्‍कर कुटुंबांमध्‍ये मोठे भांडण पाहायला मिळत आहे. अभिषेक एक कर्तव्‍यदक्ष जावई म्‍हणून महेंद्र (परेश गनात्रा) आणि उर्मिला (भक्‍ती राठोड) यांना मदत करत आहे, तर गायत्री अण्‍णांना (देवेन भोजानी) मदत करत आहे. अभिषेकला त्‍याच्‍या स्‍वत:च्‍या घराचे दरवाजे बंद करण्‍यात आले आहे. असे असले तरी महेंद्रला अखेर त्‍याची लाडकी मुलगी गायत्री आणि त्‍याचा जावई अभिषेक यांना एकत्र आणण्‍याचा मार्ग सापडला आहे. 

अण्‍णा गायत्रीच्‍या मदतीसाठी काही लोकांना नियुक्‍त करण्‍याचे ठरवतो. दुसरीकडे अभिषेक घोषणा करतो की, तो अण्‍णाची परवानगी न घेता किंवा कोणालाच न सांगता बेंगळुरूला जात आहे. अण्‍णा दोन महिला मदतनीसांचा शोध घेत असल्‍याचे समजल्‍यानंतर अभिषेक आणि महेंद्र हे दोघेही चंद्रमुखी आणि सुलक्षणाच्‍या रूपात वेषांतर करतात. या दोन्‍ही 'महिला' अण्‍णाच्‍या घरात येतात. रस्‍त्‍यावरील सर्व बघ्‍यांची त्‍यांच्‍यावर नजर खिळून जाते. 

महेंद्रची भूमिका साकारणारा परेश गनात्रा म्‍हणाला, ''मला महिलेची भूमिका साकारायची असल्‍यामुळे मालिकेमधील आगामी ट्विस्‍टसाठी शूटिंग करण्‍याचा अनुभव अद्भुत होता. मी मान्‍य करतो की, महिलेप्रमाणे पोशाख करणे खूपच आव्‍हानात्‍मक आहे, पण आम्‍ही सेटवर या गोष्‍टीचा खूप आनंद घेतला. मी माझा नऊवारी साडी व दागिन्‍यांमधील लुक पाहून अचंबित झालो. 

अभिषेकची भूमिका साकारणारा अक्षय केळकर म्‍हणाला, ''माझ्यासाठी हा पूर्णत: नवीन अनुभव होता. मी त्‍या प्रत्‍येक क्षणाचा आनंद घेतला. कलाकार म्‍हणून महिलेची भूमिका साकारणे खूपच आव्‍हानात्‍मक आहे. पटकथा खूपच मजेशीर व रोमांचक आहे. मला खात्री आहे की, आमचे प्रेक्षक आगामी एपिसोड्सचा खूप आनंद घेतील. मी आमच्‍या प्रेक्षकांनी आमच्‍यावर केलेला प्रेमाचा वर्षाव व पाठिंब्‍यासाठी त्‍यांचे आभार मानतो.

 

टॅग्स :भाकरवडी मालिका