Join us

लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट

By admin | Updated: August 2, 2015 04:46 IST

ऊर्मिलावरचं माझं प्रेम म्हणजे खरं तर लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट होतं. माझे वडील महेश कोठारे यांच्या ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटासाठी त्यांना मी असिस्ट करीत होतो. तेव्हा मी ऊर्मिलाला

ऊर्मिलावरचं माझं प्रेम म्हणजे खरं तर लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट होतं. माझे वडील महेश कोठारे यांच्या ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटासाठी त्यांना मी असिस्ट करीत होतो. तेव्हा मी ऊर्मिलाला प्रत्यक्ष बघितलं आणि मी तिच्या प्रेमात पडलो. त्यामुळे तिच्याशी बोलण्यासाठी मी धडपडायचो. आमच्यात आधी मैत्री झाली. त्यानंतर आम्ही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स कधी झालो, आमचं आम्हालाही कळलं नाही. या मैत्रीतूनच आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो आणि लग्न झालं; पण आम्ही नवरा-बायकोपेक्षाही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत जसे आधी होतो. कारण, मला वाटतं, की नवरा-बायकोच्या नात्यात मैत्रीच नातं असलं तरच ते खेळीमेळीचं राहत. नाही तर अपेक्षांचं ओझं आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर त्यावरून भांडणं होऊ शकतात. ऊर्मिला खरोखरच माझी आजही खूप चांगली मैत्रीण आहे. आयुष्यात काही घडलं तरी मी तिला सांगितलं नाही, असं कधीच झालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की मैत्री आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मैत्रीमध्ये दोन मित्र-मैत्रिणींमधलं प्रेम असतचं; पण प्रेमातही ती मैत्री टिकून राहणं हे त्यापेक्षा महत्त्वाच असतं. - आदिनाथ कोठारे, अभिनेता