Join us

‘दंगल’ गर्लचा पाहा स्टनिंग अंदाज!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2017 03:28 IST

‘दंगल’ हा चित्रपट सध्या सिनेमागृहांमधून गेला असला तरी, यातील स्टारकास्ट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आम्ही मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्याविषयी बोलत

‘दंगल’ हा चित्रपट सध्या सिनेमागृहांमधून गेला असला तरी, यातील स्टारकास्ट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आम्ही मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्याविषयी बोलत नसून, चित्रपटातील बबिता फोगाटची भूमिका साकारणारी फातिमा सना शेख हिच्याविषयी बोलत आहोत. ‘दंगल’मुळे रातोरात हिट झालेली फातिमा सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे काही स्टनिंग फोटोज पोस्ट करून आपल्या फॅन्सशी कनेक्ट असते. फातिमाचा असाच काहीसा स्टनिंग लुक पुन्हा बघावयास मिळाला आहे. फातिमाने नुकतेच फोटोशूट केले आहेत. ज्यातील काही फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ब्लॅक ड्रेस परिधान केलेल्या फातिमाचा लुक स्टनिंग दिसत आहे. फातिमाला अभिनयाबरोबर डान्सिंग आणि फोटोग्राफीचीही प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती संधी मिळेल तेव्हा इन्स्टाग्रामवर तिचे काही हटके फोटोज शेअर करीत असते.