Join us  

ऐकिवात नसलेल्या गाण्यांचे लिरीक व्हिडीओ करणार कौशल

By admin | Published: August 26, 2015 4:48 AM

अनेकदा जुनीच काय पण नवीन गाणीही इंटरनेटवर उपलब्ध असतातच असे नाही. पण चाहते मात्र विशिष्ट संगीतकाराचे आणि त्याच्या गाण्याचे वेडे असतात.

अनेकदा जुनीच काय पण नवीन गाणीही इंटरनेटवर उपलब्ध असतातच असे नाही. पण चाहते मात्र विशिष्ट संगीतकाराचे आणि त्याच्या गाण्याचे वेडे असतात. अशा वेळेस आवडत्या संगीतकाराची सर्वच्या सर्व गाणी आपल्याला कधीही ऐकता आली पाहिजेत असा अट्टहास असतो आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चाहते ही बाब संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवतातही. अशाच काही चाहत्यांच्या प्रेमापोटी कौशल इनामदार यांनी तोडगा काढला आहे. आपल्या चाहत्यांनी कधीही न ऐकलेली गाणी आणि काही गाण्यांचे लिरीक व्हिडीओ करून यूट्यूबवर उपलब्ध करून देण्याचा विचार सध्या कौशल करीत आहे. तुम्हाला कशी वाटतेय ही कल्पना?