Join us

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’च्या ट्रेलरची चर्चा!

By admin | Updated: July 1, 2017 03:08 IST

बऱ्याच दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेला अलंकृत श्रीवास्तव यांचा बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला आता

बऱ्याच दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेला अलंकृत श्रीवास्तव यांचा बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला आता भारतात रिलीज करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याने निर्माते आणि सेन्सॉरमध्ये वाद निर्माण झाला होता. एकता कपूर हिच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत बनविण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा अशा चार महिलांची आहे, ज्या स्वातंत्र्य आयुष्य जगू इच्छितात. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये दाखविण्यात येत असलेली चार महिलांची कथा खूपच दमदार असल्याचे बघावयास मिळते. रतना पाठक-शाह, कोंकणा सेन शर्मा आणि अहाना कुमरा यांनी अतिशय दमदार भूमिका केल्यास असून, बोल्ड सीन्स देण्यातही त्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. ट्रेलर बघून एक गोष्ट स्पष्ट होते की, निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाशी का भांडावे लागले असेल? कारण चित्रपटाचा विषय हा खूपच संवेदनशील आहे. त्यातच चित्रपटात दाखविण्यात आलेले सेक्स सीन्स आणि शिवीगाळ चित्रपटासाठी खूपच त्रासदायक ठरणारी आहे. असे असतानाही निर्मात्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, भारतात चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे.