Join us

लेकीचे कौतुक

By admin | Updated: January 5, 2015 23:29 IST

‘क्राइम मास्टर गोगो’ना सध्या लेकीला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले आहे. २०१४ वर्ष अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी यशस्वी ठरले. तिचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले.

‘क्राइम मास्टर गोगो’ना सध्या लेकीला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले आहे. २०१४ वर्ष अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी यशस्वी ठरले. तिचे सर्वच स्तरांतून कौतुक झाले. अनेक प्रसिद्ध मासिकांच्या मुखपृष्ठावरही ती झळकतेय. २०१४ मध्ये तिचे फोटो ज्या मासिकांच्या कव्हरपेजवर आले त्या सगळ्या पानांचे कोलाज करून त्यांनी ते फ्रेम करून ठेवले आहेत. श्रद्धाही घरी आलेल्यांना हे कोलाज अभिमानाने दाखवत असते.