स्मृती इराणींनी राजकारणात चांगलीच उभारी घेतली असून मानव संसाधन विकास मंत्रालयासारखे महत्त्वाचे कॅबिनेट खाते त्यांना मिळाले आहे. राजकारणात स्मृती सध्या व्यस्त आहेत; पण त्यामुळे त्यांनी अभिनय सोडलेला नाही. दिग्दर्शक उमेश शुक्ला यांच्या ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात स्मृती असीनच्या आईच्या भूमिकेत आहेत. चित्रीकरणादरम्यान या दोघींना एकमेकींसोबत बराच वेळ घालवता आला, त्यामुळे त्यांच्यात चांगले नाते निर्माण झाले आहे. दोघी चित्रीकरणादरम्यान जेवण सोबत करत असत. स्मृती इराणींना राजकारणात मिळालेल्या यशामुळे असीनही खुश आहे. त्यांच्याकडे लाडवांचा डब्बा पाठवून तिने आनंद व्यक्त केला.
स्मृतीला असीनने पाठवले लाडू
By admin | Updated: May 30, 2014 09:30 IST