Join us  

मीडियाच्या कॅमेऱ्यापासून मुलीला कायम दूर का ठेवते राणी मुखर्जी?, Koffee With Karan 8मध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:45 PM

राणी मुखर्जी तिची मुलगी आदिराला मीडियाच्या कॅमेऱ्यापासून आणि लाईमलाईटपासून दूर का ठेवते यामागचं कारण तिने सांगितलं आहे.

करण जोहरचा (Karan Johar) लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विद करण' च्या आगामी एपिसोडमध्ये मुखर्जी बहिणी येणार आहेत. काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) एकत्र येत शोची शोभा वाढवणार आहेत. यावेळी दोनही अभिनेत्री अनेक खासगी आयुष्याबाबत खुलासा करताना दिसणार आहे. राणी मुखर्जी तिची मुलगी आदिराला  मीडियाच्या कॅमेऱ्यापासून आणि लाईमलाईटपासून दूर का ठेवते यामागचं कारण तिने सांगितलं आहे.  

अभिनेत्री राणी मुखर्जीने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले होते. या कपलला आदिरा नावाची मुलगी असून ती आता आठ वर्षांची आहे. मात्र, गेल्या आठ वर्षांत अभिनेत्रीच्या मुलीचा एकही फोटो सार्वजनिकपणे काढण्यात आलेला नाही. पापाराझी अनेकदा स्टार्सच्या मुलांचे फोटो क्लिक करायला धावतात. पण राणीच मुखर्जीची मुलगी याला अपवाद आहे. 

राणी म्हणाली की, तिच्या मुलीने सामान्य आयुष्य जगावे अशी तिची इच्छा आहे. तिने इतर मुलांबरोबर अभ्यास केला पाहिजे. . इतर मुलांना जसे स्वातंत्र्य मिळते तसे स्वातंत्र्य तिलाही मिळाले पाहिजे. जर ती कॅमेऱ्यासमोर आली तर तिला राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची मुलगी म्हटले जाईल. मग ती सामान्य आयुष्य जगू शकत नाही. म्हणून आदित्य चोप्राला वाटते आपल्या मुलीचा एकही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये.  

राणीचे म्हणणे ऐकल्यानंतर करण जोहरने तिला विचारले की आदि (राणी मुखर्जीचा नवरा) कोणत्या गेटमधून बाहेर पडतो, जिथे त्याला कोणी स्पॉट करत नाही किंवा त्याचा फोटो काढला जात नाही? त्याला कोणते सीक्रेट गेट  माहित आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना राणीने सांगितले की, आदित्यला खूप साधे कपडे घालणे आवडते आणि त्यामुळे तो अनेकवेळा फोटोग्राफर्सच्या नजरेतून सहज सुटतो. 

टॅग्स :राणी मुखर्जीकरण जोहर