Join us  

वडील पोलीस हवालदार, घरची परिस्थिती बेताची, पण पोराने नशीब काढलं; आज आहे साऊथचा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 8:00 AM

अभिनेत्याकडे जवळपास १000 कोटींहून अधिक संपत्ती मालक आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील नावाजलेला अभिनेता म्हणजे चिरंजीवी (chiranjeevi). उत्तम अभिनय आणि संवादफेक कौशल्य यामुळे चिरंजीवने साऊथसह बॉलिवूडच्या प्रेक्षकांवरही राज्य केलं आहे. स्वभावातील साधेपणामुळे या अभिनेत्याने कायमच प्रेक्षकांची मन जिंकली. त्यामुळेच आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खासगोष्टी

अभिनेते चिरंजीवी यांची लोकप्रियता केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर ते एक उत्तम चित्रपट निर्माते आणि एक थिएटर आर्टिस्ट देखील आहेत. त्यांचा पहिला टॉलिवूड चित्रपट १९७८ मध्ये रिलीज झाला. पहिल्या चित्रपटापासून चिरंजीवी ऑल राउंडर होते. त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती. चिरंजीवी यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. इतकंच नव्हे तर आजच्या घडीला इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत चिरंजीवी यांच्या नावाचादेखील सामावेश आहे.

चिरंजीवी यांचा जन्म २२ ऑगस्ट १९५५ रोजी आंध्र प्रदेशातील मोगालथुरमध्ये झाला.वडील कॉन्स्टेबल असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत राहायच्या. परिणामी, चिरंजीवी यांचं शिक्षण वेगवेगळ्या गावांमध्ये झालं.  चिरंजीवी यांचे  वडील कॉन्स्टेबल नोकरी करत होते. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती जेमतेम होती. पण आता ते कोट्यावधींच्या मालमत्तेचे मालक आहेत. 

Caknowledge.com च्या अहवालानुसार चिरंजीवी आजच्या घडीला १५०० कोटी रूपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. चिरंजीवी केवळ चित्रपटांतूनच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनदेखील कमाई करत असतात. चित्रपटात अभिनय करण्याच्या फीस व्यतिरिक्त ते चित्रपटाच्या एकूण नफ्यामधूनही काही हिस्सा घेत असतात. एका ब्रँडला एंडोर्स करण्यासाठी देखील ते भरमसाठ फीस घेत असतात. ते दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील सर्वाधिक करदात्यांपैकी एक आहेत.

चिरंजीवी हे हैदराबादमध्ये त्यांच्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या आलिशान बंगल्याची किंमत सुमारे २८ कोटी इतकी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बंगळुरूमध्ये आणखी एक नवीन घर खरेदी केल्याची चर्चा आहे. चिरंजीवी यांना वेगवेगळ्या आलिशान गाड्यांचीदेखील आवड आहे. त्यांच्याकडे रेंज रोव्हर आणि रोल्स रॉयस अशी अनेक वाहने आहेत. त्यांच्या कारची किंमत सुमारे एक ते तीन कोटींच्या घरात आहे. रोल्स रॉयस ही कार त्यांना त्यांचा मुलगा राम चरण याने भेट दिली होती.

टॅग्स :चिरंजीवी