Join us  

आंद्रे रसेल आणि रिंकूने गायलं शाहरुखचं लुट पुट गया गाणं, व्हिडिओ पाहून तापसी पन्नू म्हणाली, "मला वाटतं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 8:59 AM

केकेआर टीममधील आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमातील 'लुट पुट गया' हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहून तापसी पन्नूही आश्चर्यचकित झाली आहे.

सध्या आयपीएलचा १७वा हंगामाची सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावरही आयपीएलची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानची कोलकाता नाइट रायडर्स टीमही आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. केकेआर टीममधील आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमातील 'लुट पुट गया' हे गाणं गाताना दिसत आहेत. त्यांचा व्हिडिओ पाहून तापसी पन्नूही आश्चर्यचकित झाली आहे. 

केकेआर आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या इन्स्टाग्राम पेजवरुन आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांचा हा गाणं गातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांच्यात जुगलबंदी झाल्याचं पाहायला मिळत आहे. लुट पुट गया हे गाणं गायल्यानंतर रिंकू आंद्रे रसेलला हे गाणं गाण्यास सांगतो. तेव्हा ते म्हणतो "तू हे गाणं गाऊ नकोस, हे माझं गाणं आहे". आणि त्यानंतर आंद्रे रसेलदेखील लुट पुट गया हे गाणं गात असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

"कोणी चांगलं गाणं गायलं? आंद्रे की रिंकू?" असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. हा व्हिडिओ पाहून डंकी फेम अभिनेत्री तापसी पन्नूनेही प्रतिक्रिया दिली आहे. तापसीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. "मला वाटतं की मी ही टूर्नामेंटमध्ये परिक्षक व्हावी", असं तापसीने म्हटलं आहे. 

दरम्यान, तापसीने डंकी सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमात शाहरुख खान, विकी कौशल यांच्यादेखील मुख्य भूमिका होत्या. २१ डिसेंबर २०२३ रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता.  

टॅग्स :शाहरुख खानआयपीएल २०२४रिंकू सिंगकोलकाता नाईट रायडर्सतापसी पन्नू