Join us  

'लोकशाही फक्त नावापुरती राहिली आहे'; किरण मानेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 8:04 PM

नुकतेच एका कार्यक्रमात किरण माने यांनी लोकशाहीवर भाष्य केलं.

बिग बॉस मराठी शोमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे किरण माने. उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे ते कायम चर्चेत येत असतात. किरण माने कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. पोस्टद्वारे सामाजिक किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडत असतात. नुकतेच एका कार्यक्रमात किरण माने यांनी लोकशाहीवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओमध्ये किरण माने म्हणतात, 'आज आपण निवडणुकांवर परिसंवाद घेत आहोत. कारण झालं असं की आपण भानावर आलोत, कधी भानावर आलोत जेव्हा आपल्या सगळ्या गोष्टींवर बंधन आली. रोजच्या जगण्यावर बंधन यायला लागली. की तुम्ही तुमच्या घरात काय खायचे, तुम्ही काय पेहराव करायचा, तुम्ही काय बोलायचे, तुम्ही सोशल मीडियावर काय पोस्ट करायची, दुसऱ्यांच्या पोस्टवर काय कमेंट करायची, यावर आता बंधन यायला लागली आहेत. सगळ्या बाजुनी तुम्हाला बंदिस्त केल्यासारखे झाले आहे. तुम्हाला कशाचा तरी धाक आहे. आणि आपण जागे झालोत हे काय सुरु झालं नक्की'.

किरण माने हे नाटक, मालिका आणि सिनेमा अशा विविध माध्यमातून त्यांनी कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. माने यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते कलर्स वाहिनीवरील 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेत झळकले होते. या मालिकेत त्यांनी सिधुंताई सकपाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला विशेष प्रेम मिळालं. त्यानंतर आता ते पुन्हा एका नव्या प्रोजेक्ट माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

टॅग्स :किरण मानेमराठी अभिनेतासेलिब्रिटी