Join us  

Kaun Pravin Tambe? Trailer Out: "ये एज वेज पे मै विश्वास नही रखता..," 'कौन प्रवीण तांबे'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 9:27 AM

Kaun Pravin Tambe? Trailer Out: कौन प्रवीण तांबेचा ऑफिशिअल ट्रेलर झाला रिलीज; मराठमोळा श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) पुन्हा एकदा दिसणार क्रिकेटरच्या भूमिकेत.

Kaun Pravin Tambe? Trailer Out: मेरी कॉम असेल, एम. एस धोनी किंवा सायना नेहवाल यांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेलेल बायोपिक आपण पाहिले असतील. परंतु आता आणखी एका खेळाडूच्या आयुष्यावर आणि त्याच्या क्रिकेटच्या प्रेमावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळा क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या संपूर्ण कारकीर्दीवर आधारित 'कौन प्रवीण तांबे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेल प्रदर्शित करण्यात आलाय. अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) या चित्रपटात प्रवीण तांबेच्या भूमिकेत दिसणार असून त्यानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचा ट्रेलर शेअर केला आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत श्रेयस तळपडे दिसणार असून त्या व्यतिरिक्त आशिष विद्यार्थी, परमब्रट चटर्जी आणि अंजली पाटील यांनीदेखील भूमिका साकारल्या आहेत. जयप्रद देसाई (Jayprad Desai) दिग्दर्शित हा बायोपिक १ एप्रिल रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कपिल देव, महेंद्रसिंह धोनी यांच्यानंतर आता प्रवीण तांबे याच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेली बायोपिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. "४१ व्या वर्षी क्रिकेट लीगमध्ये डेब्यू करण्याऱ्या राईट आर्म्ड लेग स्पिनर प्रवीण तांबेच्या एक्स्ट्राऑर्डिनरी प्रवासाबद्दल हा चित्रपच आहे. यापूर्वी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना, फर्स्ट क्लास क्रिकेट तो खेळला नव्हता. ही गोष्ट अशा व्यक्तीची आहे जो आपल्या भाग्याशी लढला आणि विजयी झाला. क्रिकेटची आतापर्यंतची सर्वात प्रेरणादायक गोष्ट," असं कॅप्शनही ट्रेलरसोबत देण्यात आलंय.

४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पणप्रवीण तांबेनं वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएल मध्ये पदार्पण केलं. राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून तो सामने खेळला आहे. त्याने मुंबई संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत पदार्पणही केलं होतं. खेळाडू ज्या वयात निवृत्तीचा विचार करतात, त्या वयात प्रवीण तांबेंला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.

टॅग्स :श्रेयस तळपदेबॉलिवूड