Join us  

Amitabh Bachchan: ‘त्या’ कृत्यासाठी अमिताभ यांनी  44 वर्षांनंतर मागितली विनोद खन्नांची माफी..., वाचा काय प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 3:05 PM

Amitabh Bachchan Vinod Khanna : ‘कौन बनेगा करोडपती 14’च्या सेटवर एका स्पर्धकाने अमिताभ यांना 44 वर्षांआधी रिलीज झालेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाशी संबंधित प्रश्न केला आणि यानंतर अमिताभ यांना माफी मागावी लागली...  

कौन बनेगा करोडपती’चा 14 वा सीझन (Kaun Banega Crorepati 14) चांगलाच चर्चेत आहे. नेहमीप्रमाणे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) हा शो होस्ट करत आहेत. अमिताभ केवळ हा शो होस्ट करत नाहीत तर हॉट सीटवर बसणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाशी मनमोकळ्या गप्पाही मारतात. कधी आपले किस्से ऐकवतात, कशी स्पर्धकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. सूरज दास नावाच्या एका स्पर्धकाने अमिताभ यांना असाच एक प्रश्न विचारला आणि यानंतर अमिताभ यांना माफी मागावी लागली.सूरज दास यांनी अमिताभ यांना 44 वर्षांआधी रिलीज झालेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाशी संबंधित प्रश्न केला आणि यानंतर अमिताभ यांना माफी मागावी लागली.  

‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान तुम्ही विनोद खन्नांना (Vinod Khanna) ग्लास फेकून मारला होता आणि यामुळे त्यांना 16 टाके पडले होते, असं आम्ही ऐकलं आहे, हे खरं आहे का? असा प्रश्न सूरज दास यांनी अमिताभ यांना विचारला. यावर...,‘खरं आहे सर, माझ्या हातून चूक झाली होती....’, असं अमिताभ म्हणाले. अर्थात अमिताभ यांनी हे जाणीवपूर्वक वा संतापून केलेलं नव्हतं. काय होता हा किस्सा? हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल तर आज आम्ही हाच किस्सा तुम्हाला सांगणार आहोत. 

रिपोर्टनुसार, ‘मुकद्दर का सिकंदर’च्या शूटींगदरम्यान अमिताभ यांना विनोद खन्नांच्या दिशेने ग्लास फेकायचा होता आणि विनोद खन्ना यांना तो नेम चुकवायचा होता. त्यानुसार, डायरेक्टरने अ‍ॅक्शन म्हटलं आणि अमिताभ यांनी ग्लास विनोद खन्नांच्या दिशेने भिरकावला. पण विनोद खन्ना यांना हा नेम चुकवू शकले नाहीत आणि ग्लास थेट त्यांच्या हनुवटीवर लागला. क्षणात विनोद खन्नांच्या हनुवटीतून रक्त वाहू लागलं. ते रक्तबंबाळ झालेत. त्यांना 16 टाके पडले. या घटनेनंतर अमिताभ प्रचंड घाबरले होते. त्यांनी त्वरित विनोद खन्नांची माफी मागितली. पण असं म्हणतात की, या घटनेनंतर विनोद खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यात कायमची दरी निर्माण झालीत. विनोद खन्ना या घटनेने इतके दुखावले होते की, त्यांनी अमिताभ यांच्यासोबत पुन्हा कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला होता.

‘मुकद्दर का सिकंदर’  हा सिनेमा 44 वर्षांपूर्वी 1978 साली रिलीज झाला होता. प्रकाश मेहरा या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. यात विनोद खन्ना, अमिताभ यांच्यासोबत राखी, रेखा, रंजीत, अमजद खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होता. चित्रपटात सिकंदर (अमिताभ) यांची कहाणी दाखवली होती.  

टॅग्स :अमिताभ बच्चनविनोद खन्नाकौन बनेगा करोडपती