Join us

जया यांच्या 'गुड्डी' सिनेमातून अमिताभ यांना का केलं गेलं OUT? इतक्या वर्षांनी झाला खुलासा! वाचा इंटरेस्टिंग किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 15:57 IST

Kaun Banega Crorepati 14, Amitabh Bachchan : ‘गुड्डी’ या सिनेमात जया यांच्या अपोझिट अमिताभ बच्चन यांची निवड झाली होती. अगदी त्यांनी 10 दिवस शूटींगही केलं होतं. पण...

Kaun Banega Crorepati 14, Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपती’चा 14 वा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. फिनाले वीकच्या या शोच्या ताज्या एपिसोडमध्ये कियारा अडवाणी व विकी कौशल यांनी हजेरी लावली. मग काय  खेळासोबत मस्तपैकी गप्पा-गोष्टीही रंगल्या. अमिताभ यांनी कियारा व विकीला अनेक पर्सनल गोष्टी विचारल्या. सोबत आपले काही पर्सनल किस्सेही शेअर केलेत. यावेळी अमिताभ यांनी ‘गुड्डी’ या सिनेमाचा किस्साही सांगितला. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण या सिनेमात जया यांच्या अपोझिट अमिताभ बच्चन यांची निवड झाली होती. अगदी त्यांनी 10 दिवस शूटींगही केलं होतं. पण अचानक अमिताभ यांचा पत्ता कट झाला आणि त्यांच्या जागी धर्मेन्द्र यांची वर्णी लागली. असं का? तर अमिताभ बच्चन यांनी स्वत: यामागचं कारण सांगितलं.

त्यांनी सांगितलं, एक सिनेमा होता. तो जयाजींचा पहिला सिनेमा होता. त्यात हिरो म्हणून माझी निवड झाली होती. मी 10 दिवस शूटींगही केलं होतं. पण मग अचानक मला हा सिनेमा सोडण्यास सांगितलं गेलं. यानंतर दिग्दर्शकांनी मला सांगितलं की, त्यांना  राजेश खन्नाच्या ‘आनंद’ या सिनेमासोबत कोणतीही स्पर्धा नको होती, म्हणून मला सिनेमा सोडायचा आदेश दिला गेला होता. या सिनेमाचं नाव ‘गुड्डी’ होतं.

तुम्हाला ठाऊक आहेच की, राजेश खन्नांच्या ‘आनंद’ या सिनेमात अमिताभ बच्चनही महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चनकौन बनेगा करोडपती