Join us  

कतरिना कैफ म्हणते रणबीरसोबतचे "ते" नाते अजूनही चांगलंच

By admin | Published: July 12, 2017 1:53 PM

बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर व अभिनेत्री कतरिना कैफ हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -  बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर व अभिनेत्री कतरिना कैफ हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आहेत. दोघंही त्यांचा आगामी सिनेमा ""जग्गा जासूस""चं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. प्रमोशनसहीत रणबीर कपूर व कतरिना कैफ यांच्यातील नात्याचीही खूप चर्चा होत आहे. 
 
कतरिना आणि रणबीरचं ब्रेक अप झाल्यानंतर दोघं एकत्र ""जग्गा जासूस"" सिनेमाचं प्रमोशन करणार की नाहीत? अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र आता दोघंही एकत्र प्रमोशन करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर आपल्या नात्यावर उघडपणे बोलतदेखील आहेत. रणबीर कपूर व कतरिना कैफ वास्तविक जीवनात कपल नसले तरी कतरिनाचं असं म्हणणं आहे की, प्रोफेशन आयुष्यात दोघांमध्ये चांगले सख्य आहे.
 
""जग्गा जासूस"" हा कतरिना व रणबीरच्या ब्रेक अपनंतरचा सिनेमा आहे. दरम्यान, कतरिनानं रणबीरसोबतच्या नात्यावर बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ""दोघांमध्ये काय सुरू आहे याचा शोध एखादा जादुगारच घेऊ शकतो. नाहीतर माझ्या मनात काय भावना आहेत याचा शोध कुणीही घेऊ शकत नाही. व्यावसायिक दृष्टीकोनातून आम्ही सिनेमाचं प्रमोशन करत आहोत. कलाकार असल्याच्या नात्यानं आमच्या दोघांमध्ये अजूनही चांगला ताळमेळ आहे. आम्ही आतापर्यंत एकत्र काम केलेल्या सिनेमांचा अनुभवही खूप चांगला होता. ती जादू या सिनेमातही कायम राहावी अशी आमची इच्छा आहे"".  तसंच मी नेहमीच आपलं खासगी आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असंही कतरिना म्हणाली. 
 
""राजनीती"" व ""अजब प्रेम की गजब कहानी"" हे दोन सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर कतरिना व रणबीरची जोडी अनुराग बासू दिग्दर्शित ""जग्गा जासूस"" सिनेमात दिसणार आहे.  दरम्यान ,काही दिवसांपूर्वी कतरिनानं रणबीरसोबत ""जग्गा जासूस"" सिनेमानंतर काम करणार नाही, असे स्पष्ट केले होतं. तर दुसरीकडे प्रमोशनदरम्यान रणबीरला विचारण्यात आले की, सिनेमामध्ये कतरिनाला घेणे यासाठी कुणाची पसंती होती. तेव्हा त्यानं तातडीनं उत्तर दिलं की, ""मी नाही तर कतरिनाची निवड अनुराग बासू यांनीच केली. मी कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाला कधीही सांगितले की नाही या सिनेमात ही हिरोईन असली पाहिजे किंवा कुणावरही आपल्या आवड-नावड लादलेली नाही"".  
 
कतरिना व रणबीरच्या सात वर्षांच्या नात्यात ""जग्गा जासूस"" सिनेमात काम करताना दुरावा निर्माण झाला. 14 जुलैला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 
आणखी बातम्या वाचा
 
दरम्यान, रणबीर कपूर सध्या पूर्णपणे ‘संजय दत्त’ झालाय. म्हणजेच सध्या रणबीर संजय दत्तची भूमिका जगतोय. संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर लीड रोलमध्ये आहे. या भूमिकेसाठी रणबीर किती तयारी करतोय, हे आपल्याला दिसते आहेच. आता संजय दत्तच्या बायोपिकशिवाय आणखी एका बायोपिकमध्ये रणबीर कपूर दिसणार असल्याची खबर आहे.
 
रणबीरला आणखी एका बायोपिकची आॅफर मिळाली आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद उधम सिंह याच्या आयुष्यावर बेतलेला असेल. सुजीत सरकार उधम सिंह यांच्या आयुष्यावर सिनेमा घेऊन येणार आहेत. या चित्रपटात सुजीत यांना रणबीर हवा आहे.
 
सूत्रांच्या मते, सरकार यांनी रणबीरला चित्रपटाची कथा ऐकवलीय आणि रणबीरला ती प्रचंड आवडलीय. अर्थात अद्याप त्याने हा चित्रपट साईन केलेला नाही. संजय दत्तच्या बायोपिकनंतर रणबीर अयान मुखर्जीच्या ‘ड्रॅगन’मध्ये दिसणार आहे.