येत्या दोन ऑक्टोबर रोजी रिलीज होणा:या ‘बँगबँग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कॅटरिना कैफ ही सध्या व्यस्त आहे, तरीदेखील तिने रणबीरच्या वाढदिवसानिमित्त वेळातवेळ काढून ‘सरप्राईज पार्टी’ दिलीच. रणबीर हा आपल्यासाठी अमूल्य असल्याचेच कॅटने यातून दाखवून दिल्याची चर्चा आहे. रणबीरने रविवारी आपला 32 वा वाढदिवस साजरा केला. याचे निमित्त साधून कॅटरिनाने आपला मित्र व दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या साथीने रणबीरसाठी खास मेजवानीचे आयोजन केले होते. या पार्टीत मोजक्याच लोकांना बोलावण्यात आले होते. रणबीरच्या शालेय जीवनातील मित्रंचा यात समावेश होता. आपल्या लहानपणीच्या मित्रंना बघून रणबीरचा आनंद द्विगुणित झाला. अयान मुखर्जीच्या घरी झालेल्या या पार्टीबाबत कॅटरिनाने मात्र मौन बाळगले आहे.
कॅटने रणबीरला दिली ‘सरप्राईज’ पार्टी
By admin | Updated: September 30, 2014 00:19 IST