Join us  

Video: कार्तिकचा साधेपणा भावला! ट्रॅफिकपासून बचावासाठी मेट्रोत येताच चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 8:50 AM

कार्तिक मेट्रोत येताच चाहत्यांनी दिलेल्या विनंतीला मान देऊन त्याने केलेल्या या खास कृतीने सर्वांचं मन जिंंकलंय. (kartik aaryan)

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही असेही काही कलाकार आहेत ज्यांचे पाय अजून जमिनीवर आहेत. असाच एक सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कार्तिकचा विनम्र आणि दिलखुलास स्वभाव नेहमीच चाहत्यांचं मन जिंकत आलाय. अशातच कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात ट्रॅफिकपासून बचावासाठी कार्तिकने मेट्रोचा आधार घेतलाय. यात चाहत्यांनी सेल्फीसाठी गर्दी केली असली तरीही कार्तिकने कोणाला नाराज केलं नाहीय.

झालं असं की.. कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. मुंबईतील ट्रॅफिकपासून बचावासाठी त्याने आपली आलिशान कार सोडून प्रवासासाठी मुंबईमेट्रोला पसंती दिली. कार्तिकला मेट्रोत पाहताच चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. एकएक करून प्रत्येकाने कार्तिकला सेल्फीसाठी विनंती केली. सुरुवातीला कार्तिकने चेहऱ्यावर मास्क लावला होता. पण नंतर चाहत्यांनी विनंती केल्याने मास्क काढून कोणाचीही निराशा न करता त्याने सर्वांसोबत सेल्फी काढला.

कार्तिक मेट्रोत प्रवास करत असल्याने त्या डब्यात लोकांमध्ये उत्साह संचारला होता.  कार्तिकचे त्याच्या चाहत्यांसोबत असलेले प्रेमळ संबंध लक्षात घेऊन सर्वजण त्याला डाऊन टू अर्थ अभिनेता म्हणून संबोधत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यन आगामी 'चंदू चॅम्पियन' मध्ये दिसणार आहे. कार्तिकने 4 मे रोजी डबिंग स्टुडिओची झलकही शेअर केली. कबीर खान दिग्दर्शित हा स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनमुंबईमेट्रोकबीर खान