ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर सुट्टया घालवण्यासाठी बँकॉकला गेले होते. खरतर तिथे सैफच्या जाहीरातीचे चित्रीकरण होते. पण त्यानिमित्ताने करीनाने सैफसोबत उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्याची संधी साधून घेतली. सैफ-करीनाबरोबर बँकॉकमध्ये करिष्माही होती.
पण आता मुंबई मिररने बँकॉकमध्ये करिष्मासोबत संदीप तोशनीवाल असल्याचेही वृत्त दिले आहे. तोशनीवालचा ३७ वा वाढदिवस होता. दोन्ही जोडप्यांनी बँकॉकमध्ये एकत्र संदीपचा वाढदिवस साजरा केला. संजय कपूरपासून विभक्त झाल्यानंतर करिष्माच्या आयुष्यात संदीपने प्रवेश केल्याची चर्चा आहे.
भारतात परतल्यानंतर कॅमेरामननी एकत्र छायाचित्र टिपले तर, पुढे काय होईल याची करिष्मा आणि करिना दोघींना चांगली कल्पना आहे. त्यामुळे करीना आणि करिष्मा एकत्र विमानतळाबाहेर आल्या. सैफअली खान स्वतंत्र कारमधून निघून गेला तर, तोशनीवाल सर्वात शेवटी बाहेर पडला.