करीना कपूर आणि शाहीद यांचे अफेअर खूप गाजले. त्यानंतर करीनाने सैफूचा हात पकडला आणि ती विवाहबद्धही झाली. पण शाहीद मात्र प्रियंका चोपडा, विद्या बालन यांच्यात अडकून पडला होता. पण तिथेही माशी शिंकली. आता मात्र तो पुढच्या महिन्यात मीरासोबत लग्न करतोय. या लग्नासाठी मला आमंत्रण मिळाले तर मी आवर्जून शाहीदच्या आनंदात सहभागी होईन, असे करीनाने सांगितले आहे. तो क्षण पुढच्या महिन्यात येतोय का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
करीना जाणार शाहीदच्या लग्नाला
By admin | Updated: June 18, 2015 03:30 IST