Join us  

करिना कपूरचा दिवाना सिद्धार्थ

By admin | Published: August 21, 2014 10:30 PM

‘एक विलेन’ या चित्रपटात अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसलेल्या सिद्धार्थ मल्होत्रला ‘लवेबल बॉय’ असा टॅग मिळाला आहे. सिद्धार्थ खासगी आयुष्यातही तेवढाच रोमँटिक असल्याचे मानले जाते.

‘एक विलेन’ या चित्रपटात अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसलेल्या सिद्धार्थ मल्होत्रला ‘लवेबल बॉय’ असा टॅग मिळाला आहे. सिद्धार्थ खासगी आयुष्यातही तेवढाच रोमँटिक असल्याचे मानले जाते. त्याचे नाव बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे; पण सिद्धार्थच्या मनात मात्र दुसरेच कोणी घर करून आहे, ती व्यक्ती आहे मिसेस खान म्हणजे करिना कपूर. नुकताच एका चॅट शोमध्ये सिद्धार्थला प्रश्न विचारण्यात आला की, बॉलीवूडमधील कोणती अभिनेत्री त्याला सर्वाधिक आवडते आणि कोणत्या अभिनेत्रीसोबत त्याला डेटवर जायला आवडेल. यावर उत्तर देताना त्याने करिना कपूरचे नाव घेतले. तो म्हणाला, मला करिना खूप आवडते. तिचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक आहे. जर संधी मिळाली तर मला तिच्या सोबत डेटवर जायला आवडेल.’ सिद्धार्थला करिनासोबत चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.