Join us

ध्यानचंद यांच्यावर करणचा चित्रपट

By admin | Updated: October 8, 2014 00:35 IST

पानसिंह तोमर, मिल्खा सिंह आणि मेरी कोमसारख्या महान खेळाडूंवर चित्रपट रिलीज झाले आहेत. महेंद्रसिंह धोनीवर लवकरच चित्रपट बनवला जाणार आहे

पानसिंह तोमर, मिल्खा सिंह आणि मेरी कोमसारख्या महान खेळाडूंवर चित्रपट रिलीज झाले आहेत. महेंद्रसिंह धोनीवर लवकरच चित्रपट बनवला जाणार आहे. आता हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही बनवण्यात येणार असून या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. करणने याबाबत टिष्ट्वट केले आहे. त्याने लिहिले की, ‘माझी मैत्रीण पूजा, आरती शेट्टी आणि मी ध्यानचंद यांच्यावर चित्रपट बनवत आहोत. या खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे अधिकार आहेत.’ चित्रपटाची बॉलीवूडमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटासाठी शाहरुखच्या नावाची चर्चा होती; पण त्याचे वय आणि त्याची इमेज पाहता या चित्रपटासाठी दुसऱ्याच अभिनेत्याची निवड करण्याची शक्यता आहे.